मोदी, शहा, जयशंकर आणि कंपनी उताणी; ट्रम्प तिसाव्या वेळी बोलले, हिंदुस्थान-पाकिस्तानचे युद्ध मीच थांबवले

‘ऑपरेशन सिंदूर’वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि कंपनी आज पुन्हा उताणी पडली. हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज तिसाव्या वेळी केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यासाठी माझ्यावर जगातील कोणत्याही नेत्याचा दबाव नव्हता, असे मोदींनी लोकसभेत सांगून काही तास उलटत नाहीत तोच ट्रम्प यांचे हे वक्तव्य आले. त्यामुळे ऐन अधिवेशनात सरकारची गोची झाली आहे.

– टॅरिफच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी पुन्हा युद्धबंदीची आठवण करून दिली. हिंदुस्थानने आमचे ऐकून युद्ध थांबवले, पाकिस्ताननेही तेच केले, असे ट्रम्प म्हणाले.