US-Israel-Iran War – मंगळवार, रात्री ८ वाजता! ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणने जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली न केल्यास, अमेरिका इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवर मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर एक पोस्ट शेअर केली असून, यात त्यांनी “मंगळवार, रात्री ८:०० (ईस्टर्न टाइम)” असा उल्लेख केला आहे. ही वेळ संभाव्य लष्करी कारवाईची किंवा इराणला दिलेली नवीन डेडलाइन असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

लष्करी हल्ल्याची वेळ सहसा जाहीर केली जात नाही. मात्र ट्रम्प यांची कार्यपद्धती कायमच वेगळी राहिली आहे. रविवारी त्यांनी इराणला पुन्हा एकदा पायाभूत सुविधांवर हल्ले करून ते नष्ठ करण्याचा इशारा दिला.

याआधी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, “इराणमध्ये मंगळवारी पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे, एकाच वेळी साजरे केले जातील. यापूर्वी असे कधीही घडले नसेल.होर्मुझची सामुद्रधुनी उघडा नाहीतर, तुम्ही नरकात जाल. फक्त बघा. अल्लाहला प्रार्थना करा.” दरम्यान, ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष मंगळवारच्या घडामोडींकडे लागले आहे.