
सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफमुळे जगभरात चर्चेत आहेत. तसेच आता अमेरिकी अधिकाऱ्यांनी एक मोठा दावा केला आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील कश्मीर समस्या सोडवण्यात ट्रम्प यांना स्वारस्य नाही, असा दावा अमेरिकी अधिकाऱ्याने केला आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा ट्रम्प अनेकदा करत असतात. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी अधिकाऱ्याने केलेल्या या दाव्याला महत्त्व आले आहे.
परराष्ट्र विभागाच्या अमेरिकी अधिकाऱ्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, कश्मीर मुद्दा हा हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील समस्या आहे. त्यात अमेरिका हस्तक्षेप करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सध्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील ही समस्या सोडवण्यात ट्रम्प यांना स्वारस्य नाही. मात्र, दोन्ही देशांनी मागणी केल्यास ट्रम्प मदतीसाठी नेहमी तयार असतील, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत अधिकाऱ्याने सांगितले की, कश्मीर हा दोन्ही देशातील मुद्दा आहे. अमेरिका त्यात हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही देशांनी चर्चेने ही समस्या सोजवावी, असे आमचे मत आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी व्यवहार किंवा इतर धोरणे ठरवताना ‘अमेरिका फर्स्ट’ हेच आमचे ध्येय असेल, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आम्ही हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यतील समस्येला प्राधान्य देण्यापेक्षा ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाला प्राधान्य देणार आहोत, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणादरम्यान ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार केला. त्यानंतर अमेरिकी अधिकाऱ्याने हा मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या दाव्याबाबत अमेरिकी अधिकारी म्हणाले की, ट्रम्प यांनी दोन्ही देशातील युद्ध थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच युद्धबंदीला पूर्णपणे मदत केली.