इस्रायलच्या प्रेमाखातर माझ्या मुलीने धर्म बदलला! ट्रम्प यांनी केले जावई आणि लेकीचे कौतुक

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली संसद नेसेटमध्ये केलेल्या भाषणाची सध्या जगभरात चर्चा आहे. या भाषणात त्यांनी मुलगी इवांका व जवाई जेरेड कुशनर यांचेही कौतुक केले. जेरेडचे इस्रायलवर इतके प्रेम आहे की त्याच्या प्रेमापोटी माझ्या मुलीने धर्मही बदलला, असे ट्रम्प म्हणाले.

इवांका व जेरेड दोघेही यावेळी नेसेटमध्ये उपस्थित होते. ट्रम्प यांनी यावेळी इस्रायल-हमासमधील युद्धबंदीचे श्रेय जावई जेरेड कुशनर यालाही दिले. गाझात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत जेरेड यांची खूप मदत झाली. त्याने खूपच चांगले काम केले, असे ट्रम्प म्हणाले. इवांका ट्रम्प यांचे पती जेरेड हे यहुदी आहेत. 2009 मध्ये त्यांनी इवांकाशी विवाह केला. त्यानंतर इवांकाने यहुदी धर्म स्वीकारला.