कश्मीरला धार्मिक रंग,ट्रम्प यांनी मध्यस्थीसाठी पुन्हा नाक खुपसले

370

जम्मू-कश्मीर प्रश्नात कुणाचीही मध्यस्थी खपवून घेणार नाही असा जबरदस्त ठोसा हिंदुस्थानने मारून देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा या प्रश्नात नाक खुपसले आहे. एवढेच नाही तर इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब करून या प्रश्नाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. कश्मीर अतिशय जटिल जागा असून येथे हिंदू-मुसलमान राहतात असे अकलेचे तारे ट्रम्प यांनी तोडले आहेत.

आठवडय़ाच्या शेवटी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या विषयावर बोलू असे सांगतानाच ट्रम्प यांनी कश्मीर ही अतिशय जटिल जागा असून येथे हिंदू-मुसलमान राहतात आणि त्यांच्यात खूप चांगले संबंध आहेत असे मला वाटत नाही असा जावईशोधही लावला. कश्मीर प्रश्नावर मध्यस्थीसाठी मला जे काही करता येईल ते करेन, असेही ते म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या