
शिवसेना आमदार हारून खान यांच्या निधीतून वर्सोवा विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासकामांचा लोकार्पण शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यात प्रभाग क्र. 64 मधील एस. व्ही. रोड, जेव्हीएलआर जंक्शन येथे शिल्प, लॅण्डस्केपिंग व सुशोभीकरण आणि प्रभाग क्र. 62 मधील बेहरामबाग नाका येथील क्रिकेटपटू स्व. अजित वाडेकर चौकाची पुनर्बांधणी व सुलतानाबाग सोसायटीमधील खेळाच्या मैदानाचे (टर्फ) लोकार्पण करण्यात आले.
लोकार्पण सोहळय़ाला शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, समन्वयक-माजी नगरसेवक बाळा आंबेरकर, चंगेज मुलतानी, नगरसेवक सबा हारून खान घिवाला, झिशान मुलतानी, उपविभागप्रमुख राजेश शेटये, उपविभाग संघटक माधुरी धनावडे, जयश्री मोरे, उत्तर-पश्चिम जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय यादव, शाखाप्रमुख एकनाथ केरकर, सुबोध चिटणीस, दयानंद सावंत, सिद्धेश चाचे, सतीश परब, महिला शाखा संघटक सुनीता घाडगे, सुप्रिया चव्हाण, सुचित्रा सावंत यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक आणि स्थानिक रहिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.























































