
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. यावेळी त्यांच्या निशाण्यावर कोणताही देश नसून सेमिकंडक्टर चिप बनवणाऱ्या कंपन्या आहेत. ट्रम्प यांनी या कंपन्यांना टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. ज्या कंपन्या अमेरिकेत गुंतवणूक करणार नाही, त्यांच्यावर भारीभक्कम टॅरिफ लावू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. याची घोषणा लवकरच करू असेही त्यांनी म्हटले आहे. ज्या कंपन्या अमेरिकेत प्लांट सुरू करतील किंवा तसा विचार करतील, त्यांना नव्या टॅरिफमधून वगळण्यात येईल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हॉईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, ‘आमचे सरकार सेमिपंडक्टर चिपच्या आयातीवर टॅक्स लावायचा विचार करतेय. अमेरिकेत चिप प्लांट सुरू करणार नाहीत, अशा कंपन्यांवर टॅरिफ लागू होईल.’ सेमिपंडक्टर चिपच्या आयातीवर 100 टक्के टॅरिफ लावू, असे म्हटले होते.
lराष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे मार्पेटमध्ये आधीच उलथापालथ आहे. जगभरात व्यापार युद्ध सुरू आहे. ट्रम्प यांनी टॅरिफचा वापर शस्त्रासारखा केला आहे. टॅरिफ लावून जगभरातील देशांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. एका फेडरल कोर्टाने टॅरिफला बेकायदेशीर म्हणून घोषित केले आहे.




























































