
इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलला अमेरिकेने पाठिंबा दिल्याचे उघडकीस आले आहे. अमेरिका आणि इराणमध्ये अणुकराराचा विषय रेंगाळला आहे. अमेरिकेने दोन महिन्यांपूर्वीच इराणला अण्वस्त्र करार करण्यासाठी 60 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. इराणने 60 दिवसांचा अल्टिमेटम पाळला नाही, असा दावा करीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-इराणच्या युद्धात आणखी तेल ओतण्याचा प्रयत्न केला. अणुकरार केला नाही तर आणखी भयंकर हल्ले करू, असे ट्रम्प यांनी इराणला ठणकावले. आज 61 वा दिवस आहे. मी त्यांना काय करायचे ते सांगितले होते, पण ते करू शकले नाहीत. आता त्यांना आणखी एक संधी देत आहोत, असे ट्विट ट्रम्प यांनी इराणला उद्देशून केले.