गणेश मंदिरातील दानपेटी फोडली, पुणे शहरातील दानपेट्या चोरीचे सत्र कायम

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मंदिरातील दानपेट्या फोडीचे सत्र कायम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भाविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः फरासखाना आणि विश्रामबाग हद्दितील मंदिरामधील दानपेट्यांतून रक्कम चोरली जात असल्याचे वारंवार घडत आहेत.

बुधवार पेठेतील फडके हौद चौकात असलेल्या गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून रक्कम चोरून नेली. ही घटना 5 मे ला पहाटेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सागर पवार (44) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बुधवार पेठेतील फडके हौद चौकात म्हसोबा मित्र मंडळाचे गणेश मंदिर आहे. 5 मेला पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दानपेटी फोडून रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुदाम बाटे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या