
अन्न आणि पाणी दोन्ही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. दोन्ही योग्य वेळी घेणे खूप महत्वाचे आहे. अनेकदा लोक जेवताना किंवा लगेच नंतर पाणी पितात. आरोग्य तज्ञांच्या मते, ही सवय पचनसंस्था कमकुवत करू शकते तसेच अनेक आजारांना जन्म देऊ शकते. जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटात गॅस आणि आम्लता निर्माण होऊ शकते. पोट फुगणे आणि जडपणाची समस्या वाढते. पचन व्यवस्थित होत नाही, यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. काही जणांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.
मसूर, राजमा, चणा डाळ शिजवण्याआधी न विसरता ‘ही’ गोष्ट करा, गॅस होणार नाही
आरोग्य तज्ञांच्या मते, अन्न पचण्यास किमान २ तास लागतात. या काळात पाणी पिल्याने पचनावर परिणाम होऊ शकतो. खाल्ल्यानंतर किमान तासाभरानंतर पाणी पिणे हे योग्य समजले जाते. तुम्हाला प्रथम पाणी प्यायचे असेल तर जेवणाच्या अर्धा तास आधी ते घेणे चांगले. अशा प्रकारे शरीर अन्नातील पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास सक्षम होते.
आपल्या स्वयंपाकघरात दडलाय व्हिटॅमिन सीचा खजिना, वाचा सविस्तर
जेवणानंतर सुमारे एक तासाने पाणी पिल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. वजन नियंत्रित राहते आणि लठ्ठपणा वाढत नाही. पचनक्रिया मजबूत होते आणि पोट हलके वाटते. गॅस आणि आम्लपित्तची समस्या होत नाही. अन्नातील पोषक तत्वांचे शोषण चांगले होते. झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शरीराला अधिक आराम वाटतो.