India Pakistan War – बातम्या दाखवताना सायरनचा आवाज वापरू नका, केंद्रीय गृहमंत्रालयाचे न्यूज चॅनेल्सना सूचना

न्यूज चॅनेल्सनी सायरनचा आवाज वापरू नये, केंद्रीय गृहमंत्रालयांचे आदेश हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशा वेळी अनेक मिडीया चॅनेल्सने या घटनेचे वार्तांकन करताना सायरनचा आवाज वापरला आहे. हे आवाज वापरू नका असे आदेश केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदुर राबवल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ले केले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुस्थानी माध्यमांनी या घटनेचे वार्तांकन करताना युद्धाच्या वेळी जे सायरन वापरले जातात त्या सायरनच्या आवाजांचा वापर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याची दखल घेतली आहे. बातम्या दाखवताना आणि वार्तांकन करताना सायरनचा आवाज वापरू नका असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने माध्यमांना दिले आहेत.