वाहतूककोंडीतून सुटकेसाठी मुंबईत डबलडेकर टनेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी संबंधित तंत्रज्ञांची बैठक घेऊन अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. ‘वर्षा’ निवासस्थानी यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत मुंबईतील वाढती वाहतूक आणि त्यावरील उपाय, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.