
लग्नातील हुंड्याचे राहिलेले 2 लाख रुपये घेऊन आल्याशिवाय नांदवणार नाही म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घनटा घडली आहे. या प्रकरणी लातूर येथे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी येथील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात विवाहिता प्रियंका अजित देशमुख यांनी तक्रार दाखल केली आहे. खाडगाव येथील अजित अशोक देशमुख यांच्यासोबत त्यांचे लग्न 28 डिसेंबर 2017 रोजी झाले होते. लग्नामध्ये 3 लाख रुपये, 16 तोळे सोने दिलेले होते. हुंड्याचे राहिलेले 2 लाख रुपये घेऊन यावेत म्हणून व चारित्र्याचा संशय घेऊन नवरा अजित देशमुख, सासू छाया अशोक देशमुख, सासरा अशोक संभाजी देशमुख यांनी छळ केला. पैशासाठी घरातून हाकलून लावले. या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


























































