
डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]
रोजच्या धकाधकीच्या जीवनात अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रवासातील अगतिकता. या प्रचंड गर्दीत दोन-अडीच तास प्रवास करत असताना लोकल गाडय़ांमध्ये टॉयलेटची सुविधा नाही. या वेळात आलेले नैसर्गिक वेगधारण केल्यावाचून पर्याय उरत नाही. त्यातूनच रोग उत्पत्ती सुरू होते.
नोकरदारांच्या आहाराचा विषय आपण मागच्या लेखात पाहिला. त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रवासातील अगतिकता. या प्रचंड गर्दीत दोन-अडीच तास प्रवास करत असताना लोकल गाडय़ांमध्ये टॉयलेटची सुविधा नाही. या वेळात आलेले नैसर्गिक वेगधारण केल्यावाचून पर्याय उरत नाही.
त्यातूनच रोग उत्पत्ती सुरू होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्ष या वेगधारण सहन करण्यात जातात, परंतु एकदा निवृत्ती झाली की, अनेक रोग आाढमण करतात. वेळीच सावधानता बाळगली तर पुढील आयुष्यही निरोगी पार पडेल म्हणून हे वेग धारण करू नये यासाठी हा लेखप्रपंच.
दोन प्रकारचे वेग आयुर्वेद सांगतो. अधारणीय आणि धारणीय वेग.
शरीराच्या नैसर्गिक पिढया आवरून धरणे म्हणजे वेगधारण करणे. असे धारण न करण्याचे वेग तेरा प्रकारचे आहेत, जे आवरून धरल्यामुळे अनेक रोग उत्पन्न होतात. ते तेरा वेग म्हणजे वात सरणे, मलविसर्जन, मूत्र विसर्जन, शिंक, तहान, झोप, खोकला, श्रम केल्यावर लागणारी धाप, जांभई, उलटी, पा किंवा अर्तवाचे निष्कासन असे हे तेरा वेग आहेत. त्यांचे कधीही धारण करू नये. ते रोखून धरल्याने रोग कसे होतात त्याचे वर्णन आयुर्वेदाच्या अनेक ग्रंथांतून दिलेले आहेत.
हे अधारणीय वेग धारण केल्यास प्रत्येक वेगानुसार होणाऱया रोगांची थोडक्यात उदाहरणे पाहू. वात सरणे थांबवल्यास पोटात गुल्म, उदावर्त, पोटात दुखणे, मलविसर्जन थांबवल्यास पायात गोळे येणे, हृदयावर दाब वाढणे, मूत्र विसर्जन थांबवल्यास पोटात दुखणे, मुतखडा होण्याचा संभव, वारंवार मूत्रसंसर्ग अशी महत्त्वाची रोग लक्षणे दिसून येतात.
शिंका रोखून धरल्यास डोकेदुखी, नाकाच्या व घशाच्या पोकळीतील दूषित स्राव तसाच राहून त्याने अधिक इन्फेक्शन वाढू शकतात. हल्ली नवीन पिढीला आवाज न करता शिंकण्याची सवय झाली आहे. त्यामुळे हे स्राव जे उत्सर्जित व्हायला पाहिजेत ते होत नाहीत. तेव्हा बिनधास्त जोरात शिंकणे गरजेचे आहे. रुमालाचा वापर मात्र जरूर करा. अधिक शिंकांचा त्रास होत असेल तर मात्र डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. भूक आणि तहान रोखण्याने आपण सर्वांनाच माहिती आहे की, थकवा येतो, चक्कर येऊ शकते. एकंदरीत स्वतची भूक पाहून वेळच्या वेळी जेवणे आणि पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
झोप रोखून धरल्यास त्याने डोळे आणि एकंदरीत खांद्यावरील अवयवांचे रोग उत्पन्न होऊ शकतात. एकाग्रता नष्ट होणे, तंद्रावस्था येणे असे दुष्परिणाम झोप रोखून धरल्यास होऊ शकतात. कास म्हणजे खोकला रोखल्यास दूषित स्राव,जंतुसंसर्ग फुप्फुसापर्यंत जाऊ शकतो.
श्रम केल्यावर लागणारी धाप रोखल्यास श्वास हृदयविकार उत्पन्न होऊ शकतात. पा रोखून धरल्यास पा अश्मरी, नपुंसकत्व येऊं शकते असे प्रमुख वेग आहेत ते धारण केल्याने रोग उत्पत्ती होऊ शकते. तेव्हा निसर्गत आलेले वेग रोखू नका. या सर्व लक्षणांमध्ये वाताचा प्रकोप होत असतो. त्यामुळे त्यावर उपाय म्हणजे बस्ती. बस्ती सारखी अतिशय उपयुक्त वाताची कुठलीही चिकित्सा अस्तित्वात नाही. आजच्या धावपळीच्या युगात बस्ती या पंचकर्मातील अत्यंत महत्त्वाच्या चिकित्सेला दुर्लक्षित करून चालणार नाही.

बस्ती घ्यावयास अतिशय सोपी आहे. या कमी खर्चाच्या चिकित्सेमुळे अनेक व्याधींवर उपचार होऊ शकतात. म्हणून इंजेक्शनचा आग्रह धरण्यापेक्षा वातावर बस्तीचा आग्रह आपल्या डॉक्टरांकडे धरावा, जेणेकरून हे वात विकार आटोक्यात राहतील.
धारणीय म्हणजे रोखून धरण्याचे वेग. हे प्रामुख्याने तीन आहेत.
मानसिक धारणीय वेग- लोभ, ाढाsध, भय, शोक, अहंकार, निर्लज्जता, ईर्षा, अति राग इत्यादी मानसिक वेग रोखून धरले पाहिजेत.
वाचिक धारणीय वेग म्हणजे उद्धटपणा, खोटे बोलणे, विनाकारण मध्येच बोलणे हे वाचिक वेग होत.
शारीरिक धारणीय वेग म्हणजे परस्त्राrविषयी अभिलाषा आणि हिंसा. हे सर्व वेग धारण करणे गरजेचे आहे, ज्यामुळे स्वतचे आणि पर्यायाने समाजाचे आरोग्य सुदृढ राहील.



























































