
गोव्याहून नवी दिल्लीला जाणाऱया इंडिगोच्या विमानात कर्नाटकच्या माजी आमदार आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अंजली निंबाळकर यांनी एका परदेशी प्रवाशाचे प्राण वाचविले. वैद्यकीय इमरजन्सी निर्माण झाली, त्यावेळी विमान 30 हजार फूट उंचीवर होते.
डॉ. अंजली या रामलीला मैदानावर आयोजित काँग्रेसच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी जात होत्या. विमानात कॅलिफोर्नियाच्या 34 वर्षी जेनी नावाच्या महिलेला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही क्षणात त्या बेशुद्ध पडल्या. विमानात डॉक्टरच्या सेवेची गरज असल्याची घोषणा होताच डॉ. अंजली यांनी पुढाकार घेतला. जेनी यांना हार्ट अटॅक आल्याची लक्षणे होती. त्यानंतर डॉ. अंजली यांनी जेनी यांना सीपीआर दिला आणि काही वेळातच जेनी शुद्धीवर आल्या. त्यानंतर डॉ. अंजली या विमान उतरेपर्यंत जेनी यांच्यासोबतच होत्या. दिल्ली येथे विमानाची प्रायोरिटी लँडिंग करण्यात आली आणि जेनी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. अंजली या मूळच्या उमरगा येथील आहेत.




























































