
वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. बी. सी. रॉय हा सर्वोच्च पुरस्कार मिळविणारा कौशल्या मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट रुग्णालयाचे संस्थापक डॉ. एच. एस. भानुशाली यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा, सून असा परिवार आहे. भानुशाली यांच्या निधनाबद्दल ठाण्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणेकरांना तत्काळ व दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी डॉ. एच. एस. भानुशाली यांनी काwशल्या मेडिकल ट्रस्ट या नावाने रुग्णालयाची स्थापना केली. या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब रुग्णांवर उपचार करीत त्यांना नवी दिशा दिली. तसेच इंडियन सर्जन असोसिएशनचे ते अध्यक्षदेखील होते. गेल्या वर्षापर्यंत ते रुग्णांच्या शस्त्र्ाक्रिया करत होते. मागील काही दिवसांपासून डॉ. भानुशाली आजारी होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
























































