DRDO चे ड्रोन विमान कोसळले, ट्रायल सुरू असताना अपघात

1112
drdo

DRDO drone crashes – कर्नाटकच्या चित्रदुर्गा येथे मंगळवारी सकाळी डीआरडीओच्या मानवविरहित ड्रोन विमानाला अपघात झाला आहे. या अपघातानंतर विमान जमिनीवर कोसळले असले तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्नाटकच्या चित्रदुर्गा जिल्ह्यात जोडीचिक्कनाहल्ली येथील एका शेतात मानवविरहित ड्रोन विमान कोसळले. घटनेची माहिती मिळताच डीआरडीओचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. चित्रदुर्गा जिल्ह्यातील मुख्यालयाच्या अगदी जवळच डीआरडीओचे टेस्ट रेंज चॅलकेरे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) आहे. तिथेच या ड्रोन विमानाचे परीक्षण सुरू होते.

रेंजपासून काही अंतरावर मोकळ्या शेतजमिनीवर हे ड्रोन विमान कोसळले. चित्रदुर्गा येथील पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ‘डीआरडीओच्या विमानाच्या ट्रायलवेळी अपघात झाला आणि ते शेतात कोसळले. अशा प्रकारची ट्रायल सुरू असल्याचे स्थानिकांना माहीत नव्हते. मात्र अपघातानंतर स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या