कांजूरमधील परिवार मैदानात पाणपोईचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजे यांच्या निधीतून कांजूरमधील परिवार मैदानात बांधण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन नुकतेच शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. शाखाप्रमुख प्रभू गवस, उपविभाग संघटक सिद्धी जाधव, प्रतिभा राणे, भारती शिंगटे, उपविभागप्रमुख बाबू ठाकूर, रवी महाडिक आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.