
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
सावळविहीर फाटा ते झगडे फाटा नाशिक महामार्गावर डाऊच खुर्द शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल जाहिरातीच्या लोखंडी बोर्डाला धडक दिल्याने वाहन चालक ठार झाला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी मयत वाहनचालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
सावळविहीर फाटा ते झगडे फाटा नाशिक महामार्गावर डाऊच खुर्द शिवारात मंगळवारी 22 मे रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास हुंडाई कंपनी ची एम. एच.१२ एफ. यु. ७७८० या क्रमांकाची कार गाडी चालक प्रशांत अशोकराव भोसले रा. मेन रोड संतोषी माता चौक, साक्री जिल्हा धुळे हा भरधाव वेगाने घेऊन जात असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल केजच्या जाहिरातीच्या लोखंडी बोर्डाला धडकल्याने झालेल्या अपघातात चालक प्रशांत भोसले हा ठार झाला. गाडीमध्ये असलेल्या इसमांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

























































