
2 वर्षांवरील सगळ्या मुलांना कोवॅक्सिनची लस देण्यास कोवॅक्सिनला मंजुरी मिळाल्याचं वृत्त मंगळवारी सकाळी सर्व वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. मात्र अवघ्या काही तासात केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांनी काहीतरी गैरसमज झाला असून तज्ज्ञांच्या समितीशी (Expert Committee) लहान मुलांनाही लस देण्यासाठी कोवॅक्सिनला परवानगी द्यावी याबाबतची बोलणी सुरू असल्याचं म्हटलं आहे.
The evaluation is still going on. There is some confusion & the talks are underway with the experts’ committee. Till now Drugs Controller General of India (DCGI) hasn’t approved it: MoS Health, Dr Bharati Pravin Pawar on approval to Covaxin for 2-18 years age group pic.twitter.com/OKb3AJDaOQ
— ANI (@ANI) October 12, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. परंतु, आतापर्यंत ही लस फक्त प्रौढांसाठीच होती. वय वर्षं 2 ते 18 या वयोगटातील मुलांनाही लस मिळावी यासाठीचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कोवॅक्सिनने परवानगी मागितली असून तज्ज्ञांच्या समितीने शिफारस केली आणि डीजीसीआयने ही परवानगी दिली तरच लहान मुलांना लस मिळू शकेल. भारत बायोटेक आणि आयसीएमआरने संयुक्तरित्या कोवॅक्सिनची निर्मिती केली आहे. देशी बनावटीची ही लस प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये 78 टक्के प्रभावी सिद्ध झाली आहे.
मंगळवारी सकाळी लहान मुलांनाही लस मिळणार याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांत म्हटलं होतं की याबाबत केंद्र सरकारतर्फे या बाबत लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत. प्रौढांप्रमाणेच मुलांनाही या लसीचे दोन डोस दिले जातील, अशी शक्यताही या बातम्यांमध्ये वर्तवण्यात आली होती. आतापर्यंत मुलांवर या लसीचा कोणताही दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलेलं नाही. त्यामुळे या लसीला मंजुरी देण्यात आली आहे असं या बातम्यांमध्ये म्हटलं होतं.





























































