शेगावमध्ये तळीराम डॉक्टरांचा पर्दाफाश

15

सामना ऑनलाईन । बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातल्या संत नगरी शेगाव येथील पशु वैद्यकीय चिकित्सालयातील दारू पार्टीचा नागरिकांनी पर्दाफाशकेला आहे. जनावरांचे आरोग्य तपासणीसाठी असलेल्या या चिकित्सालयात पशु वैद्यकीय अधिकारी नेहमीच ओल्या पार्ट्या झोडत असल्याची कुणकुण अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांना लागली होती.

शनिवारी दुपारी २ वाजेपासून काही डॉक्टर्स नेहमी प्रमाणे पशु वैद्यकीय चिकित्सालयात ओल्या पार्टीचा आनंद घेत आहेत अशी माहिती स्थानिकांना मिळताच तेथे पोहचले. त्यामुळे डॉक्टरांच्या ओल्या पार्टीचा बेरंग झाला. सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. आणि वाट दिसेल तेथे डॉक्टर पळू लागले. काहींनीतर भींतीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र लोकांनी त्यांना पकडले.

यावेळी पशु चिकित्सालयाच्या इमारतीमध्ये दारूच्या बाटल्या, मटन, पोळ्या आणि पाण्याच्या बाटल्या दिसून आल्या.या संबंधीची माहिती नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असून त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

विशेष म्हणजे पशु वैद्यकीय चिकित्सालयाला लागूनच बसस्थानकातील पोलीस चौकी आहे. मात्र बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्या या ओल्या पार्टीची खबर पोलिसांनाही नाही या आश्चर्य व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या