दुबईत अडकलेले 186 कामगार महाराष्ट्रात सुखरूप परतले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे दुबईत अडकलेले 186 गोरगरीब कामगार सुखरूप आपल्या महाराष्ट्रात परतले आहेत. ‘मसाला किंग’ डॉ. धनंजय दातार यांनी पुढाकार घेऊन या कामगारांना महाराष्ट्रात परतण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केल्यामुळे त्यांची अखेर घरवापसी झाली आहे.

कोरोनाच्या प्रभावामुळे महाराष्ट्र-हिंदुस्थानातून दुबईसारख्या देशात कामासाठी गेलेले अनेक गोरगरीब कामगार लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर या कामगारांच्या परतीचा सर्व खर्च डॉ. दातार यांची अल अदील ट्रेडिंग कंपनी करीत आहे. यामध्ये 186 महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली आहे. या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. दातार म्हणाले, दुबईतील लॉकडाऊन संपल्यानंतर अमिरातीतून हिंदुस्थानापर्यंत किमान काहतूक पूर्ककत झाली. मात्र दुबई ते मुंबईदरम्यानची उड्डाणे अगदी अलीडेच सुरू झाली. या ठिकाणी गेलेले 65000 लोक दुबईत अडकून पडले आहेत. त्यामध्ये रोजगारकंचित झालेल्या क पैशाअभाकी निकारा गमाकलेल्या कामगारांची संख्याही मोठी आहेत. त्यामुळे डॉ. दातार यांचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

आतापर्यंत तीन हजार हिंदुस्थानी मायदेशात परतले
डॉ. दातार यांच्या ‘अल अदील’ कंपनीने सामाजिक बांधीलकीचा भाग म्हणून अशा गरजू हिंदुस्थानींना स्वखर्चाने मायदेशी पोहचवण्याची मोहीम हाती घेतली. याआधी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी हजारो कुटुंबांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे व जंतुनाशकांचे संच मोफत पुरवले. आता कामगारांच्या विमान तिकीटाचा, वैद्यकीय चाचणीचा खर्च उचलून मायदेशात आणत आहेत. यामध्ये केरळ, तामीळनाडू, पंजाब, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील 3000 हून अधिक गरजूंना हिंदुस्थानात सुखरूप आणले आहे. यासाठी 3 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला. या उपक्रमात परवानेविषयक कामात राहुल तीळपुळे व अकबरअली ट्रव्हल्सचे सुलेमान यांची मदत झाली.