दुलीप ट्रॉफी 2024 साठी BCCI ने चार संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही.
BCCI ने दुलीप ट्रॉफीसाठी चार संघांची घोषणा केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाल-बॉल क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबर 2024 पासून सुरूवात होणार आहे. हे सर्व सामने आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि कर्नाटकातील बंगळूरूमध्ये खेळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे चारही संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अभिमन्यू ईश्वरन या युवा खेळाडूंच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया मायदेशात बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेत वर्णी लागू शकते.
अ संघ – शुभमन गिल (कर्णधार), लोकेश राहूल, तिलक वर्मा, कुलदीप यादव, मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिवम दुबे, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, तनुष कोटियन, आकाश दीप, विद्वथ कावेरप्पा, कुमार कुशाग्र आणि शास्वत रावत.
ब संघ – अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयसवा, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, साई किशोर, मोहित अवस्थी आणि एन नटराजन.
क संघ – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सूर्यकुमार यादव, साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, बी इंद्रजित, हृथिक शोकीन, मानव सुतार, उमरान मलिक, व्यशक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडेय, आर्यन जुयाल आणि संदीप वॉरियर.
ड संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), यश दुबे, देवदत्त पडिकल, इशान किशन, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, सौरभ कुमार, आकाश सेंगुप्ता, केएश भारत, सारांश जैन, अर्शदिप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा आणि अथर्व तायडे.