देवीसूक्त… निसर्गसूक्त!

 

स्मिता पोतनीस,विज्ञान अभ्यासक,[email protected]

मातीतून प्रगटणारी ती… सगळ्या पंचमहाभूतांशी तिचं नातं… सार्वजनिक नवरात्रोत्सवात तिच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरीसच्याच असतात…. कधीही विघटन न होणाऱया… तिच्यातूनच निर्माण झालेल्या पर्यावरणाने… समुद्राने हे आघात किती सहन करायचे…?

गणेशाला निरोप दिल्यावर त्याच्या आईला दुर्गेला निमंत्रित केलं जातं. तीही तिच्या नऊ रुपात दर्शन देण्यासाठी प्रेमाने येते. ती आली की तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ती नवरात्रीत. उत्साह, ऊर्जा, शक्तीचं पूजन. महिषासुराला मारणारी देवी म्हणजे स्त्रीतील आंतरिक शक्ती जागृत झाल्याचं प्रतिक. समुद्र जिचं निवासस्थान आहे. वारा, पाऊस यांना धारण करणारी. जीवमात्रांच्या आरोग्याची काळजी घेणारी संपूर्ण प्राणीमात्रात, विश्वात जिचं वास्तव्य आहे. प्रत्येकाच्या श्वासोश्वासात ती आहे. ती जीवन आहे अशी देवी दुर्गामाता. तिच्या स्वागताला सगळे सज्ज झालेले असतात. पण त्या उत्साहात काही गोष्टींचा विसर पडतो आणि खरी परंपराही विसरली जाते. मातीने केलेल्या मूर्तीचं पूजन ही खरी परंपरा.

देवीचं स्वरूप अतिशय देखणं, नजर खिळून राहिल असं असतं. ते कशा रीतीने करतात याचा विचार आपल्या कधी मनात येतो? जी चराचरात आहे तिला साकार रुपात आणताना प्लास्टर ऑफ पॅरीसने बनवलेले तिचं रूप मनातील कल्पनेने साकारलं जातं. ते साकारताना मात्र नजर खिळून राहण्यासाठी जे रंग वापरले जातात त्या रंगातील रसायनं देवीच्या विसर्जनानंतर पाण्यात शेवाळ व्हायला कारणीभूत ठरतात. ते शेवाळ मासे आणि इतर जलचर खातात. ते मासे नंतर माणसं खातात. अन्नसाखळी असल्याने त्याचा परिणाम माणसांवर होतोच होतो. त्या रंगाला चमक आणण्यासाठी त्यात पारा, शिसं, कार्बन, कॅडीयमचा वापर केला जातो. ते विषारी घटक जलचरांसाठी हानिकारक ठरतात. जी देवी चराचरात आहे तिला साकार करताना तिचं रूप डोळ्यात भरावं म्हणून प्रयत्न केला जावा? तिची भक्ती करणं महत्त्वाचं की तिचं रूप? तिच्या महिषासुरमर्दिनी रुपालाही स्त्राrसौंदर्याच्या मर्यादेत बांधलं जातं. तिला सुंदर करताना पर्यावरणाचा विचार करणं गरजेचं नाही का? देवीला तरी हे रुचत असेल? त्या रंगात वापरल्या जाणाऱया त्या घटकांमुळे त्या मूर्तीची किंमत कमी होते. त्यापेक्षा, दोन चार मंडळ मिळून त्यांनी त्यांचे अभिमान बाजूला ठेऊन जर एकत्रित देवीची मूर्ती आणली तर पर्यावरणासाठी चांगला असणारा महागातला रंग वापरलेली मूर्ती घेता येणं शक्य होईल. कोणत्याही दैवताची मूर्ती मोठी केली की तिला महानपण मिळत नाही. देव महान असतोच. त्यामुळे आपोआप मूर्ती आकाराने कमी केली जाईल. मूर्ती आणताना कोणत्याही मंडळाने विसर्जन झाल्यानंतर होणारी मूर्तीच्या स्थितीची कल्पना करावी. मोठमोठय़ा मूर्तींचं विसर्जन करताना त्यांच्यातला देव संपुष्टात आलेला असतो का? त्यांना प्रेमाने आणलं जातं आणि विसर्जन करताना ढकलून दिलं जातं. नंतर पाणी बाहेर घेऊन येतं त्या भग्न मूर्ती. मूर्तींचे अवशेष. देव नसतो त्यात? मग, पर्यावरणाला हानिकारक असं पाऊल उचलावच कशाला? त्यांचा अपमान करण्यासाठी त्यांना पाचारण केलं जातं?

समुद्र जर देवीचं निवासस्थान आहे असं मानलं जातं तर समुद्राला प्रदूषित करताना काहीच वाटत नाही? त्यातील जलचरांना हानी पोचवली तर देवी खुश होत असेल का?

ती प्रत्येकाच्या श्वासोच्छ्वासात असेल तर हवा शुद्ध राहावी यासाठी प्रयत्न व्हायला नको का? तरच ती आपल्या आरोग्याची काळजी घेते त्याला आपल्याकडून प्रतिसाद दिला जाईल. देवीच्या स्वागतासाठी मोठमोठे आवाज करण्यापेक्षा सगळ्यांच्या कानाला सुखद वाटेल आणि वातावरण प्रसन्न होईल अशा रीतीचे काही संगीत असेल तर ध्वनीप्रदूषणही होणार नाही.

देवीची मूर्ती करताना पर्यावरणाचा विचार केला तर मूर्ती तयार करण्यासाठी माती, गवत, पेपर, कार्डबोर्ड अशा गोष्टींचा वापर केल्याने मूर्ती पर्यावरणाला अनुकूल, वजनानेही हलक्या होतील. विसर्जनानंतर पाण्यात मिसळून गेल्याने पाणी प्रदूषित होणार नाही.

नवरात्रीत उत्साहाने पर्यावरण विविध प्रदूषणापासून मुक्त करण्याचे काही उपक्रम आखले गेले तर नक्कीच देवी प्रसन्न होऊ शकेल. गणेशानेही आपल्या उत्सवात असं करण्यापासून कोणाला रोखलेले नाही. तेव्हा नवरात्र साजरी करताना काही वेगळ करायचं की फक्त मागचा कित्ता पुढे गिरवायचा ते ठरवायला हवं.

पर्यावरणाची सुरक्षा आपल्याच हाती!

नवरात्रात देवीची आपण उपासना करतो. पण आपल्या वागण्यात तर फार मोठी तफावत दिसते. पर्यावरणाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होईल अशाच क्रिया केल्या जातात. त्यामुळेच हकेत किंका अन्नात सजीकांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळतात.

पर्यावरणाला हानी झाली तर जीकन नष्ट होईल अथका किस्कळीत होईल असे घटक काताकरण, जल आणि भूप्रदेशात मिसळू शकतात. ते आपल्याला टाळता येऊ शकते.

सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे. त्यातच सांडपाण्यामुळे मातीची सुपीकता कमी होते आणि त्यात किषारी पदार्थ मिसळले जातात.

समुद्रामध्येही प्लॅस्टीक आणि घातक पदार्थ आपण टाकतो. त्यामुळे समुद्रातील मासे तग धरू शकत नाहीत. जगात दरकर्षी प्रदूषणामुळे एक कोटीहून अधिक प्राणी मृत्यू होतात.

हका, माती, डोंगरदऱया, जंगल, त्यातील प्राणी कनस्पती, सूक्ष्म जीक, कीटक याशिकाय काळकंट, बर्फाने आच्छादलेली शिखरे, समुद्र, नद्या, त्यातील सर्क प्रकारचे जीक पर्यावरणावर अवलंबून असतात.

लहान मुलांच्या जीकालाही पर्यावरणाच्या हानीमुळे धोका निर्माण होतो. प्रदूषणामुळे लोकांचे जीकनमान धोक्यात आले आहे. लोकांना स्कच्छ ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे या नवरात्राच्या निमत्ताने सर्कांनी संकल्प करायला हवा की पर्याकरणाचा समतोल राखण्यासाठी सर्कांनी भाग घ्यायचाच.

 

आपली प्रतिक्रिया द्या