हिवाळ्यात चेहऱ्याला फेशियल किंवा क्लीनअप यापैकी काय करणे श्रेयस्कर आहे? जाणून घ्या

ऋतू बदलानुसार आपल्याला चेहऱ्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी ही फार मोठ्या प्रमाणात घ्यावी लागते. म्हणूनच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पार्लरमध्ये जातानाही काही गोष्टी लक्षात ठेवणे हे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येकाला ग्लोईंग त्वचा हवी असते. पण त्यासाठी मात्र नेमकं काय करायचं हे आपल्याला अनेकदा कळत नाही. आपण आहार आणि त्वचेची काळजी या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणे हे आवश्यक आहे.

पोटावरील चरबी कमी होण्यासाठी ‘ही’ घरगुती पेयं प्यायलाच हवीत, वाचा

आहारातील उत्तम बदल हा निरोगी त्वचेसाठी खूप गरजेचा आहे. सध्याच्या घडीला केवळ स्त्रियाच नाही तर, चमकदार त्वचा मिळविण्यासाठी पुरुषही आता फेशियल करु लागले आहेत. हिवाळ्यामध्ये फेशियल करावं की क्लिनअप यातील कोणता पर्याय त्वचेसाठी जास्त फायदेशीर आहे. हेच आपण जाणून घेणार आहोत.

हिवाळ्यामध्ये फेशियल करावं की क्लीनअप जाणून घ्या

हिवाळ्यात फेशियल आणि क्लिनअप दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत. परंतु त्वचेचा प्रकार, त्वचेची समस्या आणि त्वचेची संवेदनशीलता यानुसार त्यांची निवड करणे गरजेचे आहे. त्वचेची कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्वचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच स्वतःसाठी योग्य पर्याय निवडावा.

मेंटली फीट राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जाणून घ्या

हिवाळ्यामध्ये क्लिनअप कसे फायदेशीर आहे?

क्लिनअप करण्यासाठी त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते. यामध्ये त्वचेची स्वच्छता, एक्सफोलिएशन आणि स्टीमिंग केले जाते. तसेच यावेळी ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स काढून टाकले जातात. क्लिनअप केल्यामुळे मुरुमे आणि पुरळ यासारख्या समस्यांचा धोका कमी होतो. हे उपचार प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि महिन्यातून १ ते २ वेळा करणं हितावह आहे.

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी हे दोन पदार्थ लावायलाच हवेत, जाणून घ्या

हिवाळ्यात फेशियल कसे फायदेशीर आहे?

हिवाळ्याच्या सीझनमध्ये फेशियल हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये सौंदर्यप्रसाधनांचा सर्वाधिक वापर करण्यात येतो. त्यामुळेच फेशियलचा परिणाम हा दीर्घकाळ चेहऱ्यावर टिकतो. फेशियल करताना त्यामध्ये क्लींजिंग, एक्सफोलिएशन, मसाज आणि फेस मास्क या पद्धतींचा अवलंब केला जातो. मुरुमे, स्किन टॅनिंग तसेच एन्टी एजिंग याकरता वेगवेगळ्या प्रकारची फेशियल केली जातात. फेशियलमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते आणि हायड्रेशन आणि चमक राखली जाते.