स्वाती मालिवाल यांचा घटस्फोट, ट्विटरवरून दिली माहिती

769
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल या त्यांचे पती नवीन जयहिंद यांच्यापासून विभक्त झाल्या आहेत. या दोघांचा घटस्फोट झाला असून स्वाती मालिवाल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. नवीन जयहिंद हे आम आदमी पार्टीचे हरयाणाचे अध्यक्ष आहेत.

‘आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण संपतात तो सर्वात दुखाचा दिवस असतो. माझ्या आयुष्यातील ते क्षण आज संपले. मी आणि नवीनने घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे. कधी कधी काही चांगली लोकंही एकत्र राहू शकत नाही. मला कायम त्याची व एकत्र घालवलेल्या क्षणांची आठवण येईल. मी देवाकडे प्रार्थना करते की आम्हाला व आमच्या सारख्याच इतरांना अशा प्रसंगाचा सामना करण्याची शक्ती दे’,असे ट्विट स्वाती मालिवाल यांनी केले आहे.

स्वाती मालिवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्या कायम महिलांच्या हक्कांसाठी लढा देत असतात. महिला आयोगाची अध्यक्ष बनणाऱ्या त्या सर्वात तरुण महिला आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष होण्याआधी त्या आपमध्ये होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या