आता मिळणार ऑनलाईन पॅनकार्ड, वाचा कशी असेल प्रक्रिया

1546

महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक असलेले पॅनकार्ड आता काही तासात बनवून मिळमार आहे. आयकर विभागाने त्वरित पॅनकार्ड बनवून देणारी प्रणाली विकसित केली असून पुढील काही दिवसात ती वापरात येणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रणालीची कार्यपद्धती आधारशी संलग्न असणार आहे. आधार कार्डाव्यतिरिक्त कोणत्याही वैयक्तिक ओळखपत्राची गरज भासणार नाही. आधार कार्डावरील प्राथमिक माहितीच्या आधारे पॅन कार्डावर माहिती भरली जाईल.  त्यानंतर आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवून माहितीची खातरजमा केली जाईल. त्यानंतर काही वेळातच ई-पॅनकार्ड तयार होईल.

पॅन क्रमांक तयार झाल्यानंतर अर्ज करणाऱ्या व्यक्तिला डिजिटल स्वाक्षरी असलेला क्यूआर कोड देण्यात येईल. क्यूआर कोड ही अर्जदात्याच्या माहितीचं सांकेतिक रूप असेल. त्यामुळे पॅन कार्डची नक्कल करून होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी हा क्युआर कोड मदत करेल. पॅन कार्ड हरवलं तर काही प्रक्रिया पार पाडल्यानंतर याच समान क्युआर कोडवरून नवीन पॅन कार्ड जारी केले जाईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या