
सामना ऑनलाईन, मुंबई
उन्हाळा सरून पावसाळा आला असला तरी त्वचेची समस्या ही अनेकांना भेडसावते. धूर,धूळ,घाम यामुळे त्वचेची हानी होत असते. खाली दिलेल्या टीप्सचा अवलंब केला तर या समस्येपासून अगदी काही सेकंदात सुटका करून घेता येऊ शकते.
- टोमॅटो अँटीऑक्सीडेंट आहेच, पण तो त्वचेवरील छिद्रे आकुंचित करतो. म्हणून दररोज एक ते दोन ग्लास टोमॅटोचा रस घ्या.
- लिंबाच्या रसामध्ये थोडे मीठ मिसळून ते हातावर चांगले मळून घ्या. हे मिश्रण घाम सोडणाऱया ग्रंथीची गती मंद करते आणि घाम कमी येईल.
- घाम जास्त येत असेल तर दररोज द्राक्षे खा. द्राक्षे खाल्ल्याने जास्त घाम येण्याची समस्या दूर होऊ शकते.
- नारळाच्या तेलामध्ये कापूर घालून हे तेल जास्त घाम येणाऱया ठिकाणी लावावे.
- घामाला दुर्गंध येत असल्यास घाम येणाऱया ठिकाणी थोडासा बेकिंग सोडा लावा. घाम येणार नाही.





























































