‘आयटेम’ प्रकरणी कमलनाथ यांना निवडणूक आयोगाची नोटीस

भाजपाच्या महिला नेत्या इमरती देवी यांना ‘आयटेम’ संबोधल्याने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना याप्रकरणी नोटीस बजावून 48 तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

कमलनाथ यांच्या शेरेबाजीवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेशमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत कोणात्याही पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन करून तणाव निर्माण होईल असे कृत्य करू नये असे आयोगाने बजावले आहे. कमलनाथ यांनी डबरा येथील निवडणूक सभेमध्ये इमरती देवींना ‘आयटेम’ म्हटले होते. त्याच्या निषेधार्थ अनेक राजकीय नेत्यांनी विविध शहरांमध्ये मूक धरणे धरले होते. राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांना नोटीस पाठवली होती. दरम्यान, कमलनाथ यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच यादीतील क्रमांकाबद्दल आपण ‘आयटेम’ हा शब्द वापरल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या