
कोरोना काळात होणाऱया निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने गाईडलाईन्स जाहीर केल्या. निवडणूकीचा प्रचार करताना मास्क कापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेकणे बंधनकारक असून अर्ज, शपथपत्र ऑनलाईनच भरावे लागणार आहेत. एका केंद्रावर एक हजार मतदारांना मतदान करता येणार असून संपूर्ण केंद्र सॅनिटाईज करून घ्यावे लागणार आहे. त्याचबरोबर मतदारांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार असून ताप असल्यास त्याला शेवटच्या तासात मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे.
बिहार विधानसभेची निवडणूकीचे पडघम वाजत आहेत. कोरोनामुळे निवडणूक कशी घ्यायची, प्रचार कसा करायचा हे सगळे प्रश्न अनुत्तरित होते. मात्र शुक्रवारी निवडणूक आयोगाने हा संभ्रम दूर करीत कोरोना काळातील निवडणूकांसाठी गाईडलाईन्स जाहीर केल्या.
एका मतदान केंद्रावर एक हजार मतदान. मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान केंद्र सॅनिटाईज करणार. प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझर ठेवण्यात येणार. बुथमध्येही सॅनिटायझर ठेवणार. जे मतदार मास्क घालून येणार नाहीत, त्यांना केंद्रावर मास्क देण्यात येतील.
प्रत्येक मतदान केंद्राकर थर्मल स्क्रीनिंग . मतदाराला ताप असल्यास मतदारांना टोकन देऊन शेवटच्या तासात मतदानाची मुभा.
कोरोना बाधित असल्यास क्वारंटाईन करण्यात आलेल्या कोरोनाच्या रुग्णांना शेवटच्या तासात आरोग्य अधिकाऱयांच्या देखरेखीखाली मतदान करता येणार.
मतदारांना सोशल डिस्टन्सिग पाळावे लागणार. मतदारांसाठी तीन रांगा असतील. एक पुरुषांसाठी, दुसरी महिलांसाठी आणि तिसरी दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल.























































