अर्थवृत्त – एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार; 7.8 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) च्या सदस्यांना जानेवारी 2026 पासून एटीएममधून पैसे कायाची सुविधा मिळू शकते. याचा फायदा देशातील 7.8 कोटी नोंदणीकृत सदस्यांना होईल. पीएफसंबंधी सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सीबीटी लवकरच यासंबंधी बैठक घेणार असून एटीएममधून पैसे कायाच्या सुविधेला मंजुरी देऊ शकते. पीएफचे पैसे कायासाठी सदस्याला ऑनलाइन क्लेम करण्याची गरज राहणार नाही. ते एटीएममध्ये जाऊन पैसे काशकतात. ईपीएफओचा आयटी इन्फ्रास्टक्चर तयार करण्यात आला आहे, असे सीबीटीच्या एका सदस्याने सांगितले आहे. मंत्रालयाने बँकांसोबत आरबीआयशीही ईपीएफओ एटीएम सुविधा सुरू करण्यासंबंधी चर्चा केली आहे.

पीएफ खात्यात 28 लाख कोटी जमा

ह सध्या देशभरात ईपीएफओअंतर्गत 7.8 कोटी नोंदणीकृत सदस्य आहेत. या सर्वांची एकूण 28 लाख कोटी रुपयांहून जास्त रक्कम खात्यात जमा आहे. 2014 मध्ये हा आकडा 7.4 कोटी रुपये आणि 3.3 कोटी रुपये होता. पैसे कायासाठी सदस्यांना एक खास कार्ड जारी केले जाईल. या कार्डद्वारे सदस्य एटीएममधून पीएफचा पैसा काशकतील.

पीएनजी ज्वेलर्सची दिवाळीनिमित्त फेस्टिव्ह ऑफर्स 

पीएनजी ज्वेलर्सतर्फे दिवाळीनिमित्त विशेष फेस्टिव्ह ऑफर्सची घोषणा करण्यात आली. ही ऑफर 22 सप्टेंबरपासून सुरू झाली असून 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार आहे, अशी माहिती पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी दिली. सोन्याच्या घडणावळीकर 50 टक्के सूट मिळणार आहे, असेही ते म्हणाले. या दिवाळी मोहिमेंतर्गत, ग्राहक सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.

कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्सचा आयपीओ 

कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ 10 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून तो 14 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. या आयपीओची प्रति शेअरसाठी 100 रुपये ते 106 रुपये किंमत ठरवण्यात आली आहे. या शेअरसाठी बोली किमान 140 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 140 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. कॅनरा बँकेकडून 137,750,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, एचएसबीसी इन्शुरन्स होल्डिंग्ज लिमिटेड कडून 4,750,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि पंजाब नॅशनल बँकेकडून 95,000,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात 

बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्ट्सने प्युअर ब्रँडची नवी अगरबत्ती वास्तूयंत्र आणि प्युअर हिना मसाला अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्त्या नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केल्या आहेत. तसेच या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 9343834805

महाराजाची टेम्पल ब्लिझ अगरबत्ती बाजारात 

महाराजा अगरबत्तीची टेम्पल ब्लिझ आणि केसर चंदन प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आली आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्त्या रघुनाथ निवास, डी. व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क रोड क्रमांक 4, दादर येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 8369185071 वर संपर्क साधा.

कल्याण ज्वेलर्सचे नवीन कलेक्शन लाँच

कल्याण ज्वेलर्सने एक नवीन ह्युस्केप कलेक्शन लाँच केले आहे. सोने आणि हिऱ्याच्या पारंपरिक निवडींपेक्षा बरेच जण रंग, व्यक्तिमत्त्व आणि शैलीसह डिझाइन स्वीकारत आहेत. हे बदल लक्षात घेऊन ह्युस्केप सादर केले आहे. पारंपरिक सोन्याचा एक जीवंत पर्याय, ज्यामध्ये व्यक्तिमत्त्व आणि आत्मअभिव्यक्तीचे प्रतिबिंब असलेली रंगीत रत्ने आहेत.

सेंटेनिअल वर्ल्ड टूर

कॅटरपिलरचा 100 व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू केलेली सेंटेनिअल वर्ल्ड टूर ही भारतात पोहोचली आहे. ही टूर पाच प्रमुख ठिकाणी भेट देणार असून कॅटरपिलरच्या विविध केंद्रांतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहे.

प्रोव्ही फूड्स

यंदाच्या सणासुदीच्या हंगामासाठी प्रोव्ही फूड्सनेआरोग्यदायी भेटवस्तूंचा दर्जेदार नजराणा सादर केला. 300 ग्रॅम, 400 ग्रॅम, 600 ग्रॅम, 800 ग्रॅममध्ये उपलब्ध असून किंमत 899 ते 1,849 रुपयांपर्यंत आहे.

एम्बेसी डेव्हलपमेंट्स

एम्बेसी डेव्हलपमेंट्सने मुंबईतील दीर्घकाळ प्रलंबित वारसा प्रकल्प सुपूर्द केले, ज्यामुळे 1200 कुटुंबे त्यांच्या स्वप्नातील घरांच्या आणखी जवळ आली आहेत. मुंबईत दोन प्रमुख प्रकल्प यशस्वीरित्या सुपूर्द केले गेले आहेत.

शंकेश ज्वेलर्स

शंकेश ज्वेलर्स लिमिटेडने आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल केला. दागिन्यांचे वैयक्तिक डिझाईन सेवा पुरवणारी ही कंपनी 2005 पासून काम करते. साहित्य खरेदी व दागिने बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया ही कंपनी प्रमुख ठेकेदार म्हणून हाताळते.