टीआरपी प्रकरणात ईडीने केला गुन्हा दाखल

टीआरपी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने पीएमएलए नुसार गुन्हा दाखल केला आहे. लवकरच ईडी काहीजणांना चौकशीसाठी बोलावणार आहे.

मुंबई क्राईम ब्रँचने टीआरपी घोटाळा उघड करून आतापर्यंत 12 जणांना अटक केली होती. तसेच काही मोठय़ा जाहिरात कंपनीच्या वरिष्ठांची देखील चौकशी केली होती. या गुन्ह्याच्या तपासात क्राईम ब्रँचने फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक केली होती. तसेच अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीत हवाला मार्फत व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.

ईडीने टीआरपी प्रकरणात पीएमएलए नुसार गुन्हा दाखल केला. येत्या काळात ईडी काहींना चौकशीसाठी बोलवणार आहेत. या पूर्वी टीआरपी प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी सीबीआयला वर्ग केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या