Edc पोहोचल्याच नाहीत, शेकडो निवडणूक कर्मचारी मतदानापासून राहणार वंचित

43

सामना प्रतिनिधी । बीड

बीड येथील निवडणूक कार्यप्रणालीच्या धीम्या कारभारामुळे शेकडो मतदार वंचित राहणार आहेत. कर्मचारी नेमलेल्या ठिकाणी निघाले तरी अद्याप त्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र (Edc) पोहोचले नसल्याने कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार आहेत.

मतदान प्रक्रिया अवघ्या काही तासांवर आली आहे. नेमलेले अधिकारी आपले कर्तव्य बजावण्यासाठी नेमलेल्या गावात पोहोचत आहेत. अद्याप या कर्मचाऱ्यांना edc म्हणजे निवडणूक कार्य प्रमाणपत्र पोहचले नाही. हे प्रमाणपत्र दाखवून त्यांना मतदान करायचे होते. प्रमाणपत्र न दिल्याने बीड शहरात वास्तव्यास असणारे शेकडो कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार आहेत. माजलगाव तालुक्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार नसल्याने कर्मचारी अस्वस्थ आहेत, जिल्हा प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या