शिक्षकांना कोंबडा केल्याची भाषा वापरणार्‍या बेताल शिक्षण मंत्र्यांचा जाहीर निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना प्रतिनिधी । नगर

सत्तेची गर्मी माणसाला कोणत्या थराला नेते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा केंद्रप्रमुखांच्या बैठकीत आला. शिक्षण मंत्री महोदयांनी राष्ट्र निर्मितीचे काम करणार्‍या शिक्षकांना कोंबडा संबोधून संपूर्ण शिक्षकांचा व शिक्षण प्रेमींचा अपमान केला आहे. असे बेताल वक्तव्य करणार्‍या मंत्र्यांचा शिक्षक भारतीच्या सभेत जाहीर निषेध करण्यात आला, असे शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी सांगितले.

शिक्षक भारतीची तातडीची सहविचार सभा अहमदनगर येथे शिक्षक भारती कार्यालयात शिक्षक नेते सुनिल गाडगे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगातप, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी सोसे, शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी,महिला राज्य प्रतिनिधी शकुंतला वाळुंज, जया गागरे, छाया लष्करे, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, शहर जिल्हाध्यक्ष प्रदिप रुपटक्के, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, विजय लंके, शरद धोत्रे, सुनिल जाधव, जॉन सोनवणे, संजय निक्रड, अरविंद आचार्य, जिल्हा सचिव मोहम्मद समी शेख, अशोक धनवडे, श्रीकांत गाडगे, ग्रथपाल संघटनेचे अध्यक्ष विलास गाडगे, संजय तमनर, जॉन सोनवणे, संभाजी चौधरी, संपत लबडे, नवनाथ घोरपडे, काशिनाथ मते, जिल्हा महिलाध्यक्षा आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, महानगर महिला अध्यक्षा माधवी भालेराव, बेबीनंदा लांडे, जयश्री ठुबे, मंजुषा गाडेकर, माधुरी सोनार,संध्या गावडे, तृप्ती वराळ, मंजुषा शेडगे, लता पठारे, सुरेखा काळे, संगिता धराडे, सविता शितोळे, नौशाद शेख, वर्षा दरेकर, शारदा लोंढे, साधना शिंदे आदींनी शिक्षण मंत्र्यांचा निषेध केला.

यावेळी कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप बोलताना म्हणाले कि, शिक्षक हा राष्ट्र निर्माता आहे. राष्ट्र निर्मितीचे काम करणार्‍या शिक्षकास त्यामुळे सर्वाधिक पगार व मानसन्मान असला पाहिजे , असे गौरवोद्गार सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने बिहार शिक्षक व शासन यांच्यातील केस संदर्भात निकाल देताना काढले. पण महाराष्ट्रात स्वतःला शिक्षण क्षेत्राचा मसिहा समजणार्‍या मंत्री महोदयांनी शिक्षण व्यवस्था मोडीत काढून शिक्षणावर होणारा खर्च काही हजार कोटी रूपये वाचवून श्रेष्ठींची मर्जी संपादन करावयाची आहे. शिक्षणात प्रगत असणार्‍या महाराष्ट्राला खिळखिळे करून सर्वसामान्यांना गुलामाच्या रांगेत उभा करायचे आहे. शिक्षकांना स्वतःच्या न्याय्य व रास्त मागण्यासाठी भिकेचा कटोरा हातात घेऊन दारात भीक मागण्यास लावायचे आहे.

यावेळी शिक्षक नेते सुनिल गाडगे बोलताना म्हणाले कि, शिक्षकात असणारी एकजूट खिळखिळी करून फोडा आणि झोडा नितीचा अवलंब करून राज्य करायचे अशी रणनिती घेऊन मार्गक्रमण करणार्‍या व शिक्षकांचा कोंबडा केला असे संबोधणार्‍या चाणक्य नितीचा निषेध असो, अनादी काळापासून कोंबड्याने समाजाला बाग देऊन जागे करण्याचे काम केले आहे. आजपर्यंत कोणत्याही कोंबड्याने मात्र अंडी घालण्याचे काम केले नाही, असे सांगितले.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर म्हणाल्या कि, शिक्षण, शिक्षक व समाजव्यवस्था मोडीत काढणार्‍या अशा अपप्रवृत्ती विरुद्ध ज्यांना ज्यांना कोंबडा बनवले ते सर्व कोंबडे नक्कीच समाज जागृतीचा बाग देण्यास सुरुवात करतील. मित्रांनो जागे व्हा. शिक्षण व्यवस्थेला, शिक्षकांना देशोधडीला लावून गुलामगिरी आणू पाहणार्‍या व्यवस्थेच्या विरोधात बांग द्यायला सुरुवात करा, नाहीतर भीकेचे काटोरे हातात घेऊन दारोदार फिरण्याशिवाय इतर काहीही हाती राहणार नाही. आपण आपल्या संघटनेवर विश्‍वास ठेऊन पाठबळ दया. शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनिल गाडगे राज्यस्तरावरील आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी भक्कम आहेत. आपण शिक्षक भारती संघटनेवर विश्‍वास ठेवा. शिक्षक भारती ही एकमेव संघटना राज्यभर काम करत आहे. आपण जागे व्हा… अन्यथा 2019 नंतर शिक्षण क्षेत्रासाठी , शिक्षकांसाठीचा काळ भयानक व भयावह असेल.