Video – कालव्यात वाहत होती अंडी, गोळा करण्यासाठी ग्रामस्थांची उडाली झुंबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये एका गावात कालव्यातून मोठ्या प्रमाणात अंडी वाहत होती. तेव्हा ही अंडी गोळा करण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड उडाली. अनेकांनी झोळी भरुन अंडी घेऊन गेले.


उत्तर प्रदेशात हरदोई जिल्ह्याती अछुआपर गावात शारदा कालवा वाहतो. सकाळी काही गावकरी कामानिमित्त बाहेर पडले तेव्हा या कालव्यातून काही अंडी वाहताना त्यांना दिसली. काहींनी ही अंडी हातात घेतली आणि ही कोंबडीची अंडी असल्याचे सांगितले. तेव्हा अनेक गावकरी या कालव्याजवळ दाखल झाले आणि त्यांनी अंडी गोळा करायला सुरूवात केली.

बघता बघा ही बातमी संपूर्ण गावात पसरली आणि अंडी गोळा करण्यासाठी गावकऱ्य़ांची एकच झुंबड उडाली. तेव्हा लोकांनी झोळी, पिशवी भरून अंडी गोळा केली. तब्बल दोन तास या कालव्यातून अंडी वाहत होती अशी माहिती उपस्थित ग्रामस्थांनी दिली. ही अंडी नेमकी कुठुन आली हे कळालेच नाही.

#हरदोई- नहर में बहते मिले अंडे।।

Posted by Global Bharat News on Tuesday, July 27, 2021