
वाराणसी येथील शास्त्रज्ञांनी वांगी आणि टोमॅटो अशी दोन्ही उत्पन्ने देणारी वनस्पती विकसित करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. आयसीएआरच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी हे तंत्र विकसित केले आहे. त्याला ‘ब्रिमॅटो असे नाव दिले आहे. ‘ब्रिमॅटो’मध्ये वांगी आणि टॉमेटो या भाज्यांची मूळ गुणधर्म कायम राहतील.
ब्रिमॅटो दुहेरी कलमांद्वारे विकसित करण्यात आले आहे. यामध्ये एकाच वनस्पती कुटुंबातील दोन किंवा अधिक ‘स्कायन्स’ एकत्रित ़ कलम केले जाते. शास्त्रज्ञांनी मूळ वनस्पती काशी संदेश (वांगी) आणि काशी अमन (टॉमेटो) एकत्र करून आयसी 111056 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांग्याच्या मुळामध्ये कलम केले. प्रत्येक ‘ब्रिमॅटो’ वनस्पतीला 2-3 किलो टोमॅटो आणि 3-4 किलो वांगी येण्याचा अंदाज आहे.
- शास्त्रज्ञांनी कलम केल्यानंतर लगेच रोपे नियंत्रित वातावरणात ठेवली. त्यानंतर तापमान, आर्दता आणि प्रकाश यांच्या नियमित देखरेखीखाली 5-7 दिवस ठेवण्यात आले. त्यानंतर 15 दिवसांनी त्यांची शेतात लागवड करण्यात आले.
- भाज्यांच्या लागवडीसाठी जागेचा अभाव जाणवत असताना एकाच वनस्पतीपासून दोन भाज्या तयार करण्याची ही नवीन पद्धत उपयुक्त ठरेल. यामध्ये खर्च कमी येतो. तसेच सध्याच्या पोषण आणि उत्पादकतेच्या आव्हानांना तोंड देण्यास मदत होईल, असे आयसीएआर-आयआयव्हीआरचे संचालक डॉ टी. के. बेहेरा यांनी सांगितले.
























































