
एसटी महामंडळाने आज संपकरी 610 कर्मचाऱयांना निलंबित केले असून एकूण निलंबित कर्मचाऱयांची संख्या आता 8,195 पर्यंत पोहचली आहे. तर आज महामंडळाने 80 रोजंदारी कर्मचाऱयांची सेवा समाप्त केली असून एकूण सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱयांची संख्या आता 1,827 इतकी झाली आहे. तसेच एसटी महामंडळाने आज सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार विविध मार्गांवर 960 बसेस सोडल्या आहेत.
एसटी महामंडळाच्या 19,086 कर्मचाऱयांनी आज कामावर हजेरी लावली आहे. मात्र सोमवारी उपस्थित असलेल्या कर्मचाऱयांपेक्षा ही संख्या थोडी कमी झाली आहे. काल सोमवार, 29 नोव्हेंबर रोजी 19,163 कर्मचारी कामावर उपस्थित झाले होते. एसटी कामगारांच्या संपामुळे ग्रामीण भागात खासगी वडाप वाहतुकीला बरकतीचे दिवस आले आहेत. मात्र संप असाच चालू राहिल्यास एसटीचे हे हुकमी प्रवासी गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अजूनही 73,180 कर्मचारी संपावरच
एसटीच्या हजेरीपटावरील कर्मचाऱयांची संख्या 92,266 इतकी आहे. त्यापैकी आतापर्यंत 19,086 इतकी असून अजूनही 73,180 कर्मचारी संपात सहभागी असून त्यात 34,954 चालक असून 25,781 वाहकांचा समावेश आहे. दरम्यान, सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार आज 960 बसेस विविध मार्गांवर सोडण्यात आल्या असून त्यात 707 साध्या, 2 हिरकणी, 174 शिवशाही, 77 शिवनेरी बसेसचा समावेश आहे.
























































