एका महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर या महिलेने दुसरे लग्न केले आणि आपल्या आठ वर्षाच्या मुलाला अनाथ आश्रमात टाकलं. पण मुलगा एवढा दुःखी झाला की त्याने आत्महत्या केली. मीरा भाईंदरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
नालासोपाऱ्यात एका महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिने दुसरे लग्न केलं. पण आर्थिक कारणामुळे ही महिला आपल्या आठ वर्षाच्या मुलाला सांभाळू शकत नव्हती म्हणून या महिलेने आपल्या मुलाला अनाथ आश्रमात ठेवलं. आठ महिन्यांपासून हा मुलगा अनाथ आश्रमात राहत होता. पण त्यांच इथे मन लागत नव्हतं तो नेहमी उदास राहत होता.
काही दिवसांपूर्वी त्याची आई त्याला भेटायला आली. तेव्हा त्याने आईकडे घरी नेण्यासाठी हट्ट केला. पण त्याच्या आईने ऐकलं नाही आणि ती निघून गेली. त्यामुळे मुलगा निराश झाला. सकाळी जेव्हा सगळ्या मुलांची हजेरी घेतली तेव्हा एक मुलगा अनुपस्थित होता. शोध घेतला तेव्हा अनाथ आश्रमाच्या आवारातील विहिरीत त्या बालकाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरु ठेवला आहे.