डोक्यावर आणून ठेवला आणि माझे मुख्यमंत्रीपद गेले;  एकनाथ खडसे यांचा फडणवीसांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्रीपदासाठी खान्देशावर कायम अन्यायच झाला. मी टरबुज्या म्हणणार नाही, पण माझ्या डोक्यावर आणून ठेवला आणि माझे मुख्यमंत्रीपद गेले, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ज्या भाजपमध्ये 40 वर्षे हमाली केली, उभे आयुष्य पक्षासाठी घातले आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत आल्यावर आपले नाव वगळण्यात आल्याचे खडसे म्हणाले.

स्वातंत्र्याला 70 वर्षे होऊन गेली, मात्र खान्देशावर अन्याय करण्यात आला. 70 वर्षांत कोकणात तीन मुख्यमंत्री झाले. विदर्भातील चार मुख्यमंत्री झाले आणि पाचवा देवेंद्र फडणवीस झाला, मराठवाडय़ातही चार मुख्यमंत्री झालेत, मात्र नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा अधिकार असतानाही 70 वर्षांत एकदाही संधी देण्यात आली नाही. ज्यावेळी संधी आली त्यावेळेस मुख्यमंत्रीपदापासून डावलण्यात आल्याची खंतही खडसे यांनी बोलून दाखवली.