
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्रकार परिषदेत साध्या विषयातील पोलीस घुसले. त्यावर खडसे यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, माझी पत्रकार परिषद सुरू असताना साध्या वेषातील पोलीस आले. माझ्या घराच्या बाहेर आताही पोलीस आहेत. माझ्या छातीवर बसण्याचा प्रयत्न करतायेत. माझा सरकारला सवाल आहे की, माझ्यावर पाळत का ठेवली जात आहे? माझा आरोप आहे की रेव्ह पार्टी हे ठरवून केलेलं षड्यंत्र आहे.
पोलिसांनी कुटुंबीयांचे व्हिडीओ, फोटो का व्हायरल केले, हा अधिकार त्यांना कुणी दिला, असा सवाल करतानाच मी पुणे पोलिसांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असे खडसे म्हणाले.
नवऱ्यासाठी रोहिणी खडसे यांनी चढवला काळा कोट
पतीच्या बचावासाठी पत्नी अॅड. रोहिणी खडसे यांनी अंगावर काळा कोट चढवला. सुनावणीवेळी थेट न्यायालयात हजेरी लावत पतीचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्नही केला. सुनावणीनंतर ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, योग्य वेळी मी त्यावर भूमिका मांडेन. माझा न्यायालयावर विश्वास आहे’, अशी भावना त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.