
निवडणूका सुलभ करण्यासाठी मला जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र रचले जात आहे. विरोधकांकडून सातत्याने छळ करून मला अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, हे सर्व मी हाणून पाडत आहे. मला त्रास दिला तर, तुमच्या बोकांडी बसेन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ईडी सरकारला दिला आहे.
माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारे आरोप करुन मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होत आहे. रोज मला व्हॉट्सऍपवर ‘काहीतरी होणार आहे’, असे मेसेज येतात. मात्र मला काही होणार नाही. जनता गेली 40 वर्षे माझ्या सोबत आहे. त्यांच्या आर्शिवादाने सर्वांना मी पुरून उरेल. मला त्रास देणाऱयांच्या ऊरावर बसेन, असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी रावेर तालुक्यातील ऐनापूर येथे राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रे निमित्ताने आयोजित सभेत बोलताना केला.
बच्चू कडू ही एक सुरुवात
शिंदे गटात गेलेल्या बंडखोर आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून ती हळूहळू बाहेर येत आहे. बच्चू कडू ही एक सुरुवात असून शिंदे-फडणवीस सरकारमधील अस्वस्थता त्यांच्या माध्यमातून बाहेर आली आहे, असे खडसे म्हणाले.































































