
गोंडगाव येथील बलात्कार प्रकरणात चमकोगिरी करण्याचा मिंध्यांचा लोचटपणा उजागर करणाऱया पत्रकाराला गद्दार आमदार किशोर पाटील यांनी कोणत्याही सभ्य माणसाला लाज वाटाव्या अशा गलिच्छ, घाणेरडय़ा भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नाहीतर त्या पत्रकाराला हात-पाय तोडण्याचीही धमकी दिली. आमदार पाटलांच्या या मिंधेगिरीचा व्हिडिओ व्हायरल होताच पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील एक 8 वर्षांची चिमुकली 30 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. चाऱयामध्ये तिचा मृतदेह आढळला. गावातीलच स्वप्निल पाटील या तरुणाने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे आणि पीडितेची बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडितेच्या कुटुंबाशी संपर्क केला. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी केली. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले.
पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चमकोगिरी करत असून जलदगती न्यायालयात प्रकरण चालविण्याच्या मागणीवर त्यांनी मौन बाळगल्याची बातमी केली. महाजन यांच्या बातमीमुळे आमदार किशोर पाटील यांचे ताळतंत्रच गेले. आमदार पाटलांनी महाजन यांना दोनवेळा पह्न केला. आमदारांचा पह्न आल्यामुळे महाजन यांनी स्वतःहून त्यांना पह्न लावला. पह्न लागताच आमदार किशोर पाटील यांनी शिमगाच सुरू केला. कोणत्याही सभ्य समाजात निषिद्ध समजल्या जाणाऱया शिव्यांची बरसातच त्यांनी केली. एवढेच नाहीतर आमदार पाटील यांनी महाजन यांना हात-पाय तोडण्याचीही धमकी दिली.
- आमदाराचे निलाजरे समर्थन
होय, मी पत्रकारला शिव्या दिल्या. ती माझीच ऑडिओ क्लिप आहे. मुख्यमंत्री चमकोगिरी करतात, असे कसे म्हणू शकतात. मुख्यमंत्र्यांविषयी काहीही बोललेले अजिबात चालणार नाही. घटनेचे गांभीर्य नसलेल्या पत्रकाराला मी शिव्या दिल्या आहेत, अशा शब्दांत आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळीचे निलाजरे समर्थन केले.
























































