
“निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं झाल्याची खात्री पटली”, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर व्यक्त केला आहे. दुबार मतदारांच्या प्रश्नावर आयोग निरुत्तर आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. क्स वर एक पोस्ट करत त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे.
X वर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची एक क्लिप शेअर करत राज ठाकरे म्हणाले आहेत की, “आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १००% खात्री पटली की, निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे.”
राज ठाकरे म्हणाले, “दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय?”
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे… दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या… pic.twitter.com/DizmmWTOkH
— Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2025
            
		





































    
    
























