हरयाणात एका टप्प्यात तर महाराष्ट्रात दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता

2126

महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. हरयाणामध्ये एका टप्प्यात तर महाराष्ट्रात दोन टप्प्यांत निवडणूक होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही राज्याच्या निवडणुकीच्या नियोजनाचे बुकलेट बनवण्याचे आदेश प्लानिंग टीमला दिले आहेत.  निवडणूक आयोग आजच हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या तारखांसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. हरयाणात एका टप्प्यात तर महाराष्ट्रात दोन टप्प्यात निवडणुका पार पाडू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या