आता इलेक्ट्रिक कार आणा दारी! 69 हजार पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचारात असाल तर केंद्राने गुड न्यूज दिली आहे. आता लवकरच देशातील 69000 पेट्रोल पंपांवर प्रत्येकी एक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन लावण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाडय़ांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

याशिवाय सरकार कंपन्यांच्या मालिकीच्या, कंपनी चालवित असलेल्या तसेच सरकारी रिफायनरी कंपन्यांच्या सर्व पेट्रोलपंपावर ईव्ही चार्जिंग वियोस्क बंधनकारक करण्याच्या विचारात आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग समस्येवरील आढावा बैठकीत वीज मंत्री आर.के.सिंह यांनी पेट्रोलियम मंत्रालयाच्या प्रमुख अधिकाऱयांना याबाबत सल्ला दिला की त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येणाऱया पेट्रोलियम विपणन कंपन्यांना सर्व सीओसीओ पेट्रोल पंपांवर चार्जिंग वियोस्क बसविण्याचा आदेश द्यावा.

राष्ट्रीय महामार्गांवरही चार्जिंग पॉईंट
पेट्रालियम मंत्रालयाच्या नव्या निर्देशानूसार सर्व नव्या पेट्रोल पंपावर कमीत कमी एक तरी पर्यायी इंधनाचा स्त्रोत अनिवार्य आहे. पर्यायी इंधनाच्या अटीमुळे बहुतांश पेट्रोल पंप इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधेच्या पर्यायाचा विचार करीत आहे. सध्याच्या उपलब्ध पेट्रोल पंपांवर जरी चार्जिंग सुविधा निर्माण झाली तरी ते इलेक्ट्रिक कारसाठी फार उपयुक्त ठरणार आहे. देशात सुमारे 69000 पेट्रोप पंप आहेत. सध्या चार्जिंग पॉईंट अभावी इलेक्ट्रिक वाहनांना विकत घेण्यास लोक तयार होत नाहीत. या निर्णयाने त्यांना प्रोत्साहन मिळेल. वीज मंत्रालयाने दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, वडोदरा आणि भोपाळसह राष्ट्रीय महामार्गांवरही वाहन चार्जिंगचे पॉईंट लावण्याचे ठरविले आहे.