वीज कामगारांच्या टेन्शनवर मनोरंजनाचा उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
electricity

ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता ‘महावितरण’चे कर्मचारी दिवसरात्र राबतात. तसेच अनेक ठिकाणी जीव धोक्यात घालून त्यांना काम करावे लागते. त्यामुळे कर्मचारी तणावाखाली असतात. तो तणाव दूर करण्यासाठी मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडळ कार्यालयांत वर्धापनदिनी आणि वर्षभरात दोन वेळा मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ‘महावितरण’चे राज्यभरात सुमारे 70 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना टेन्शनमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी वर्धापन दिनानिमित्त एक आणि वर्षभरात अन्य दोन मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार वर्धापन दिनामित्त मुख्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमासाठी आणि स्नेहभोजनासाठी अडीच लाख रुपये तर परिमंडळ कार्यालयासाठी तीन लाख 20 हजार रुपये खर्चमर्यादा निश्चित केली आहे.