विजेच्या धक्क्याने पाच महिन्यांत 429 जणांचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

राज्यात गेल्या पाच महिन्यांत विजेच्या धक्क्याने तब्बल 429 जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये 423 नागरिक आणि सहा वीज कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर अडीचशे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर 624 प्राण्यांनाही जीव गमवावा लागला आहे. निष्काळजीपणा आणि अतिउत्साहाचे हे बळी आहेत.

महावितरणनने हजारो किलोमीटरच्या वीज वाहिन्यांचे जाळे उभारून घराघरात आणि शेतामध्ये वीज पोहचवली आहे. घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आयएसआय मार्क असलेली विजेची उपकरणे असणे अवश्यक आहे. मात्र अनेकदा कमी किमतीत मिळणाऱ्या सुमार दर्जाच्या विद्युत उपकरणांचा वापर केला जातो. त्यामुळे विजेच्या उच्च व्होल्टेजमुळे उपकरण जळून विजेचा धक्का बसल्याच्या अनेकदा घटना घडतात. तसेच नागरिकांकडून अनेकदा पाळीव प्राणी विजेच्या खांबाजवळ बांधले जातात. त्यामुळेच विजेचा धक्का बसून त्यांचे सर्वाधिक बळी गेले आहेत. मगील तीन वर्षांच्या तुलनेत विजेच्या धक्क्याने जाणाऱ्या बळींची संख्या घटत आहे. काम करत असताना वीज कर्मचाऱ्यांचे विजेच्या धक्क्याने जाणारे बळी कमी करण्यासाठी महावितरणने कर्मचाऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या साहित्यांचे सेफ्टी ऑडिट सुरू केले आहे.

प्रशिक्षण, संशोधन विकास केंद्रातून सुरक्षेचे धडे

विजेच्या धक्क्यामुळे जाणाऱ्या बळींची संख्या कमी करण्याबरोबरच कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून महावितरणकडून नाशिक येथे प्रशिक्षण, संशोधन विकास केंद्रातून कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे धडे दिले जातात. तसे