
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांची संपत्ती थेट 600 अब्ज डॉलर म्हणजेच 54.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 600 अब्ज डॉलरचा आकडा गाठणारे मस्क हे जगातील पहिले अब्जाधीश ठरले आहेत. स्पेसएक्स कंपनीने 800 अब्ज डॉलरचे मूल्यांकन गाठल्याने आणि आगामी काळात आयपीओ आणण्याची कंपनीने तयारी केल्याने मस्क यांच्या संपत्तीत अवघ्या एकाच दिवसात 168 अब्ज डॉलर म्हणजेच 15 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ अंबानी यांच्या एकूण निव्वळ संपत्ती 110 अब्ज डॉलर म्हणजेच 10 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. मस्क यांचे एकूण नेटवर्थ 638 अब्ज डॉलर आहे. स्पेसएक्सच्या मूल्यांकन वाढीचा मस्क यांना सर्वात जास्त फायदा झाला आहे. मस्क हे या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. स्पेसएक्समध्ये मस्क यांच्याकडे 42 टक्के हिस्सेदारी आहे. मस्क हे जगातील पहिले ट्रिलियनियर बनू शकतात, असा अंदाज फोर्ब्सने वर्तवला आहे.
































































