मस्क यांची संपत्ती 750 अब्ज डॉलरच्या पार

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची संपत्ती 750 अब्ज डॉल म्हणजे 67.18 लाख कोटी रुपयांच्या पार गेली आहे. मस्क हे या इतक्या संपत्तीचा आकडा गाठणारे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत. यापूर्वी 16 डिसेंबर रोजी मस्क यांची संपत्ती 600 अब्ज डॉलर ( 54 लाख कोटी) पर्यंत पोहोचली होती.

ही वाढ डेलावेअर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे झाली, ज्यामुळे मस्क यांचे 56 अब्ज डॉलरचे टेस्ला पे पॅकेज वाढून 139 अब्ज डॉलर झाले. ‘फोर्ब्स बिलियनेअर्स इंडेक्स’मध्ये मस्क यांची निव्वळ संपत्ती सध्या 649 अब्ज डॉलर दिसत आहे. ही हिंदुस्थानच्या टॉप 40 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीइतकी आहे. यासोबतच मस्क यांची संपत्ती त्यांच्या नंतर येणाऱया जगातील सर्वात श्रीमंत टेक अब्जाधीशांच्या (लॅरी पेज 252.6 अब्ज, लॅरी एलिसन 242.7 अब्ज, जेफ बेझोस 239.4 अब्ज) एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहे.