वर्षभरात 42 हजार लोकांना दंश; जगात हिंदुस्थान आघाडीवर

350

देशातील सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या असून वर्षभरात राज्यातील 42 हजार 26 जणांना दंश झाला आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 36 हजार 858 घटना घडल्या आहेत. साप चावण्याच्या जगभरातील घटनांमध्ये निम्म्या घटना या हिंदुस्थानात घडल्या आहेत.

महाराष्ट्रात नाशिकमध्ये सर्पदंशाच्या सर्वाधिक 4 हजार 294 घटना उघड झाल्याचे ‘एल्सेव्हिएर जर्नल’ या अहवालात म्हटले आहे. तसेच या कारणामुळे दगावणाऱयांची संख्याही हिंदुस्थानातच जास्त आहे.

  • 2017-18 च्या अहवालानुसार राज्यात एक लाख लोकसंख्येमागे 32 लोकांना साप चावला आहे. पश्चिम बंगाल आणि तामीळनाडूमध्ये 36, गोव्यात 34 लोकांना साप चावला आहे.
  • 2018 -19 मध्ये महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे 35 तर पश्चिम बंगालमध्ये 39 लोकांना साप चावला आहे.
    ठाण्यात 2 हजार 655 जणांना सर्पदंश

    मागील दोन वर्षांत राज्यातील 14 जिह्यांत सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये 12 जिह्यांत सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. 2018-19 मध्ये पालघरमध्ये 3,204, ठाण्यात 2,655, कोल्हापूर 2,298, पुणे 2,102, रत्नागिरी 1,994 आणि जळगावमध्ये 1,842 घटना घडल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या